File:साबुदाणा रताळीचा विकासी पराठा परभणी महाराष्ट्र भारत.jpg

Original file(2,448 × 2,448 pixels, file size: 578 KB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary edit

Description
मराठी: साबुदाणा रताळीचा विकासी पराठा

परभणी महाराष्ट्र भारत

  • साबुदाणा रताळीचा विकासी पराठा*

सुगरण गृहिणी ना आदरपूर्वक नमस्कार . 🙏🏻🙏🏻🙏🏻 परवा महाशिवरात्र , काल शुक्रवार उपवासाचा आणि आजही अमावस्या उपवासाची . उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी , भगर , उपवास भाजणी , बटाटे , रताळी आणि भरपुर फळं हे समीकरण जनू ठरलेलंच असतं .

" फक्त नावानं उपवास !

पोटभर खाल्लं झक्कास !! उपाशी राहण्याचा आहे त्रास ! असं केल्यानं कसा होईल शारीरिक तब्येतीचा विकास !! "

हे असं आहे आमचं उपवास म्हणजे एवढं मोठं भिजवायचं आणि करायचं .

बरं खायला करायला कसला हा त्रास . एवढं तर करावच लागतं आणि उपवासाच्या दिवशी हे अंदाज हमखास चुकतो . मग उरलेल्या भिजवलेल्याचं काय बरं करावं ? हा मोठा प्रश्नच पडतो . उपवास उपवासाचं खाऊन कंटाळा येतो . हं एक दिवस खूप छान वाटतं , पण नेहमी साठी नाही हं !

  उपवासाचे पदार्थ जेवणात वापरावे कसें ?

म्हणुनच तर हा '" साबुदाणा रताळीचा विकासी पराठा "' .

*साबुदाणा रताळीचा विकासी पराठा* 

साहित्य :- साबुदाणा - १वाटी

           रताळ्याचा किस -२वाटी 
         शेंगदाण्याचा कुट - २-३चमचे 
       बेसन पीठ -१/२आर्धी वाटी 
  गव्हाची कणीक -३वाट्या/ ( कणीक मळूस्तर )

मिरची आणि आद्रक पेस्ट - मीठ - जिरं - ओवा - चवीनुसार

कृती :-  प्रथम भिजवलेला साबुदाणा , रताळीचा किस , शेंगदाण्याचा कुट , बेसन घालून ते मिश्रण मळून घ्या .
  नंतर त्यात मीठ , जिरं , ओवा आणि मिरची - आद्रक पेस्ट घालून पुन्हा एकदा मळून घ्या .
 आता यात कणीक पीठ मळून तिंबवुन  घ्या .
  • टिप * :- साबुदाणा रताळीचा किस हा आधीच ओला असल्याने त्यात कणीकेसाठी पाणी घालू नये .

तिंबवलेल्या कणीकीचे पराठे लाटून तव्यावर थोडे तेल / तुप घालून भाजून घ्या . आता आपला "साबुदाणा रताळीचा विकासी पराठा " तयार झाला . "साबुदाणा रताळीचा विकासी पराठा" सोबत शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा आंब्याचं / लिंबाचं लोणचं खा .

   "' झालं नं मस्त !
  मग करून टाका फस्त !!
करुयात पदार्थ झक्कास !

काळजी नको तुमच्या सोबत आहे हा विकास !! "'

मला खात्री आहे की , तुम्हीही ही रेसिपी करणार आहातच . कारण तुम्ही त्याची " *पोळी विकासाची भाकरी* " ही रेसिपी केली आहे . अशी माझी आशा आहे .

बरं पुन्हा भेटू त्याच्या हातच्या नव्या रेसिपीज मध्ये . तोपर्यंत सुगरण गृहिणी ना आदरपूर्वक नमस्कार .

पुन्हा एकदा शेवटी अगदी खरं सांगतो . "अरे याला कोणी तरी चांगले शिकवा रे!"

कसा होईल याचा विकास !?!
Date
Source Own work
Author Vikas Rameshrao Lohagaonkar

Licensing edit

I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.


food
This file was uploaded by a participant of a photography competition, which was organized by the West Bengal Wikimedians User Group.
To see other files uploaded during competitions organized by the user group, please check this category.

English | македонски | +/−

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current11:43, 24 March 2021Thumbnail for version as of 11:43, 24 March 20212,448 × 2,448 (578 KB)Vikas Rameshrao Lohagaonkar (talk | contribs)Uploaded own work with UploadWizard

There are no pages that use this file.

Metadata