“महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान” हे २०१७ साली सुरु झालेले महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास विभागाचा उपक्रम आहे. ग्राम पंचायत पातळीवर ग्राम विकास दूताच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करवून घेणे व लोकांना त्यांचे प्रश्न सोडाविण्यासाठी तयार करणे असे मुख्य उद्देश असलेल्या या अभियानात नंदुरबार जिल्ह्यातील १८ ग्राम पंचायतींचा समावेष करण्य़ात आला होता. यात नवापुर तालुक्यातील बिजगाव, भादवड, वाटवी, निंबोणी, बोरचक व चिखली या ग्राम पंचायतींचा समावेष असून धडगाव (अक्राणी) तालुक्यातील खरवड, चोंदवाडे, बोरवण, राडीकलम, खांडबारा, खडक्या, सोन, मनवाणी, मनखेडी, चुलवड या ग्राम पंचायती, अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ व नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. या अभियानात जिल्हा कार्यकारी अधिकारी या पदावर ऍड.योगिनी खानोलकर कार्यरत असून तालुका स्तरावर तीन तालुका समन्वयक काम पाहतात. श्री.प्रफुल रंगारी हे राज्य स्तरीय मिशन मॅनेजर असून अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार मा.डॉ.रजाराम दिघे, संचालक, ग्रामीण गॄह निर्माण, महाराष्ट्र राज्य यांनी नुकताच स्विकारला आहे.या पृष्ठावर अभियानामार्फत या पुर्वी झालेल्या व होत असलेल्या कामांचे फोटो व व्हिडीओ पहावयास मिळतील.